-
तरूतळी – TAROOTALEE
या स्थळी तरूतळी स्वच्छ सुंदर झोपडी धरी शिरी सावली गर्द झुंबर झोपडी झुलतसे बाळ गुणी पांघरोनी गोधडी अंगणी सई विणे अंगडी अन टोपडी लिहित बसे गोप कोणी उघडुनी चोपडी दूर तिथे बोलण्यात दंगलेली चौकडी नगरजन नित्य येती वाट करुनि वाकडी
-
खरे काय आहे – KHARE KAAY AAHE
खरे काय आहे बरे काय आहे कळावे तुलारे तुझे काय आहे तुला पाहिले मी तुला ऐकले मी तरी जाणलेना भले काय आहे गुपीते मनाची जुनी रेखताना जरा अनुभवावे नवे काय आहे इथे पूर्ण नाही कुणाचेच काही तरी आस शोधे पुरे काय आहे किती मोह तुजला उणे शोधण्याचा अता अधिक शोधू खुले काय आहे नसे तू…
-
खरे स्वप्न हे – KHARE SWAPN HE
तुला भाजते जर मृदुल चांदणे कसे भर दुपारी असे चालणे जरी टाकवेना पुढे पावले तरी तू मनाने शिखर गाठणे इथे कार्य अर्धे करू पूर्ण ते जिवा ध्यास घेऊ पुरे छाटणे उगा कोश विणणे फुका उसवणे गगन झेप घेण्या तया फाडणे पुन्हा धीर देण्या बरे बोलुया पतंगास वेड्या नको जाळणे भुकेल्या जनांना भरव घास रे बनव…
-
सुपली – SUPALEE
सुकली खपली उडली खपली गहू चवीचा असली खपली रडकी कन्या हसली खपली भरण्या कचरा सुपली खपली जखमा भरता धरली खपली नकळत माझ्या पडली खपली स्वर्ग गाठण्या गळली खपली मात्रावृत्त – (४+४=८मात्रा)
-
काया अनमोल – KAAYAA ANAMOL
प्राजक्ताचे देठ जणु, ओठ तुझे जर्द बाई, ओठ तुझे जर्द गुलाबाच्या फुलापरी, गाल तुझे लाल बाई, गाल तुझे लाल बागेतल्या भृन्गासम, कृष्ण तुझे नेत्र बाई, कृष्ण तुझे नेत्र सावळ्या या मुखावरी, चाफेकळी नाक बाई, चाफेकळी नाक कुंडलात शोभणारे, कान तुझे छान बाई, कान तुझे छान श्यामरंगी घनापरी, केस तुझे दाट बाई, केस तुझे दाट पौर्णिमेच्या…
-
फुलझडी – FULZADEE
गझल माझी मधुर बाला वाचते बाराखडी वाचताना बरसते बघ चांदण्यांची फुलझडी चंद्र सुंदर अंबरीचा रंगलेला या क्षणी मुग्ध त्याचे रूप कोमल टिपुन घेते ही घडी तारकांचा खेळ चाले पकडण्या उल्केस या सापडेना ती तयांना खेळती मग त्या रडी ही न उल्का ही कळीरे आत्मगंधी दंगली फेकण्या जाळे तिच्यावर राज्य घेई नवगडी राज्य घेतो ध्रुव जेव्हां…
-
भेट – BHET
पेरता मी बियाणे खरे नंबरी वृक्ष चुम्बेल आता घना अंबरी काय देऊ तुला भेट मी सुंदरी नाद हृदयातला वाजता घुंगरी शोधण्या फूल दुर्मीळ जे माणसा रानवाटा फिरे मी तळी अंतरी दावले रूप देवा तुझे मी जगा प्राण ओतून मूर्तीतल्या कंकरी मी लढे माझिया सावळ्या मिळविण्या होउदे जीत वा अंत या संगरी वृत्त – गा ल…