-
अविस्मरणीय – AVISMARANIYA (unforgettable)
कसं लिहू काय लिहू म्हणता म्हणता लिहिती झाले प्याला दिला साकीने जो पोटामध्ये रिचवित गेले बरळत सुटले वाचत सुटले रडत हसत लिहित सुटले गझलांवरती गझलांचे मी सुंदर इमले रचत गेले रंगून गेले माझे इमले गगन अवघे चुंबीत गेले प्रेमिकांना अचंबीत करून स्वतःमध्ये रंगून गेले चुंबन कोणा वंदनीय कोणाकोणाला पूजनीय कोणा अगदी तिरस्करणीय! पण मन म्हणते…
-
शुभस्य शीघ्रम – SHUBHASYA SHEEGHRAM ((do good or auspicious work without delay)
इतुक्या सुंदर भूमीवरती जगावयाला मिळते आहे भाव फुलांचा तयात दरवळ भरावयाला मिळते आहे लाल असुदे अथवा काळी भूमी प्रसवे वृक्ष लतांना उलते फुलते अंकुर जपते उदरभरण प्राण्यांचे करण्या काठावरती वसोत वाड्या सरिता दुहिता अखंड वाहो नीर तिच्यातील शुद्ध ठेवण्या मती आमुची तत्पर राहो अभयारण्ये हिरव्या राया वन्य जिवांना मुक्त फिराया प्रकृतीतल्या अन्न साखळ्या रहो सलामत…
-
अक्षर माझे – AKSHAR MAZE (my handwriting)
वाटुन पाला मी मेंदीचा तळहातांना रंगविले जास्वंदीच्या चुरुन पाकळ्या गालांना मी रंग दिले तेल तुपाची धरुन काजळी नेत्र पाकळ्या लांबविल्या विडा चघळुनी त्रयोदशगुणी अधर पाकळ्या खुलविल्या जाइजुईचा गजरा गुंफुन सुवासिक मम कुंतल झाले निशिगंधाचा सुगंध प्राशुन तनमन अवघे पुलकित झाले शुभ्र मोगरा हिरवा चाफा भूचंपक तो जर्द जांभळा दौतीमध्ये भरण्या शाई प्राजक्तासम टपटप झरला मोरपिसाची…
-
चिरी – CHIREE (line of vermilon_
सुकुमार पाकळ्यांचे जाणून भाव काही रानातल्या फुलांचे घडवू जडाव काही लढण्यास आम जनता आहे तयार जेथे तेथे रणांगणी मी सोसेन घाव काही कुजणार संपदा ही येताच मोड त्याला मुलगी म्हणे पित्याला करते लिलाव काही भालावरी चिरी ती रेखून आज आली पाते तिला सुरीचे म्हणतात राव काही ज्यांच्यात हे पडोंनी होतात जायबंदी ते बुजाविण्यास खड्डे घालू…
