-
माझे स्वतंत्र गाणे – MAAZE SWATANTRA GAANE
गाऊन मी लिहावे माझे स्वतंत्र गाणे रंगात चिंब न्हावे माझे स्वतंत्र गाणे भय वासना कशाला? मिटवून प्रश्न आता प्रेमात विरघळावे माझे स्वतंत्र गाणे गावोत पाखरे अन फुलपाखरे उडावी त्यांच्यापरी झुलावे माझे स्वतंत्र गाणे मम शब्द नाचणारे फुलवोत भावनांना मौनासही कळावे माझे स्वतंत्र गाणे प्राशून स्नेह प्रीती फुलवात तेवताना उजळून लख्ख जावे माझे स्वतंत्र गाणे
-
श्रावणा रे – SHRAAVANAA RE
श्रावणा रे शिंप झारी पंचमीला आल्या पोरी देऊळात राऊळात मंदिरात रागदारी सोनसळी ऊन झरे कौलारू या घरांवरी कंकणे तू भर बयो कासारीण आली घरी अंगणात गुलबक्षी दवबिंदू जुईवरी पाखरांचा दंगा चाले जास्वंदीच्या फांदीवरी रंगभोर इंद्रधनू आभाळाच्या भाळावरी नाचू गावू फेर धरू फुललेल्या भुईवरी
-
बाहुल्या – BAAHULYAA
बाहुल्या नाचल्या सावळ्या गाजल्या मेघना वर्षल्या तारका हासल्या मधुर ज्या लाजल्या कंकणा वाजल्या लक्षुमी पावल्या बालिका बोलल्या गायिका गायल्या सुंदरी छुमकल्या चंचला तापल्या चंदना घासल्या माधुरी प्यायल्या अमृता गोठल्या बावऱ्या जागल्या केतकी टोचल्या कुंतला झोंबल्या कोकिळा कुहुकल्या माधवी बिलगल्या दामिनी प्रकटल्या शुभ्र त्या झळकल्या चांदण्या बरसल्या श्रावणी रंगल्या अश्विनी बहरल्या यामिनी उजळल्या शैलजा बैसल्या सुप्रिया…
-
ऋतूगान – RUTU-GAAN
आषाढ ओढाळ चैत्रात सौंदर्य वैशाख तेजाळ ज्येष्ठात संगीत तारूण्य माघात पौषात सामर्थ्य रंगीत भाद्रपद देहात जल्लोष आत्म्यात संतोष
-
काझी राजी – KAAZEE RAAJEE
काझी राजी बेबी माझी बीबी माजी कांचन आजी पाणी पाजी नायक दाजी हंटर बाजी उत्तम भाजी स्वप्ने ताजी
-
या – YAA
या या खा प्या द्या घ्या गा जा टा टा
-
रमण – RAMAN
अजय अभय सजल उदय पवन मलय जलद वलय पळव प्रलय नयन प्रणय रमण समय