-
दीप शर्वरी – DEEP SHARVAREE
श्रावण रमणी दीप शर्वरी दिवा लाविते श्रावण रमणी गोड गोजिरी दिवा लाविते पश्चिम सूर्याला वंदोनी हृदय मंदिरी श्रावण रमणी पीत पावरी दिवा लाविते अंधारे अंगण उजळाया तिन्हीसांजेस श्रावण रमणी वधू लाजरी दिवा लाविते हळदीकुंकू रेखुन भाळी तुळशीपाशी श्रावण रमणी प्रिया बावरी दिवा लाविते इंद्रधनूवर झोके घेउन दमल्यावरती श्रावण रमणी गझल नाचरी दिवा लाविते
-
आखाडी अवस – AAKHAADEE AVAS
सांजेला पिंपळी येताच थवे आखाडी अवस पेटवी दिवे पिंपळ पारावर मैफलीत गप्पांच्या अड्ड्यात सुंदर खल आषाढी धारांत गटारी न्हाती खळखळ वेगे धावत जाती खराटे घेऊन निघाल्या बाया झाडून गटारी दिवे लावाया गटार तीरी समयांची रांग तुळशीच्या रानी डोलते भांग
-
आत्मभक्ती – AATMA BHAKTEE
जीव जाणतो जीवांमध्ये ज्ञान राहते जीवाहुन या अमुल्य दुसरे काही नसते कर्म करावे जैसे तैसे फळ मिळते जाणू आत्म्यातील आनंद लुटाया भय सारे त्यागू सम्यकदृष्टी जीवांसाठी आत्मधर्म आहे शरण्य अपुल्या आत्म्याहुन ना कुणी अन्य आहे अंतर्यामी शुद्धात्म्याला सदैव ठेवावे अपुल्या वाटेवरून निर्भय होऊन चालावे आत्मशांतीची खरी संपदा जीवा लाभाया आत्मभक्तीला जाणुन घ्यावे मुक्ती साधाया
-
भिजली वर्दळ – BHIJALEE VARDAL
जवळपास वा दूरदूरवर ओळख सुकली भिजते आहे हिरवा श्यामल फिकट पारवा श्रावण घन मनी दाटत आहे निळसर राखी सडकेवरुनी भिजली वर्दळ वहात आहे वर्दळीस मी भरून डोळी घनास मनीच्या शिंपीत आहे किलबिल चिवचिव ऐकायाला वाऱ्यासंगे हलता झाडे पत्र्यांवरती टपटप उतरत पाऊस तेव्हा म्हणतो पाढे असेच केव्हातरी आवडे जगावयाला पावसासही पाढे म्हणता म्हणता गातो माझ्यासंगे मजेत…
-
कानाफूसी – KAANAAFOOSEE
(ग़ज़ल) मजाक में या कुछ मतलब से मनकी बाते कहदी मैंने बुरा नहीं था मतलब सचमे मेरे मनकी सुनली मैंने कानाफूसी करके फैली बातबात पनघटपर उडकर बातका काटा चुभ गया दिलको क्योंकी सुनली दिलकी मैंने झूठ बातभी इतनी सुन्दर हो सकती है पता नहीं था झुठसे झूठा पंगा लेकर सचकी झोली भरदी मैंने नाम आज…
-
माझी तरही – MAAZEE TARAHEE
तरही तरिही तरली तरली गझलियतीने चढली तरली माझी तरही लाख गुणाची जरी तरकली टिकली तरली उले आणखी मिसरे सानी गुंफुन तरही बनली तरली फुले पाखरे पर्णरुपातुन तरही कशिद्यावरली तरली तरहीमधुनी हसत सुनेत्रा झुल्यावरती झुलली तरली
-
वर्दी – VARDEE
अजून माझ्या निळ्या कपाटी वर्दी खाकी आहे करी कायदा घेण्याची मम इच्छा बाकी आहे वेग कशाला फुका वाढवू जाईन आरामात दो पायांची माझी गाडी चौदा चाकी आहे फिरविन लाठी वीजेसम मी कोसळण्या ढग हट्टी कातळ काळ्या दंडी माझ्या बिल्ला वाकी आहे अर्धा प्याला कसा भरू मी कधी न चिंता केली भरून प्याला देण्या जवळी प्रतिभा…