सलतो उरात काटा हसतो गुलाब हारे
करतात ढोंग अश्रू फसशील लोचनारे
रुतती फुलेच आम्हा वदतात कोण जोगी
तुडवून पुष्प पायी हसतात भोगणारे
लपवून आत वाफा बिजली कडाडतेही
झरशील मूक मेघा बुडतील काठ कारे
उडतो नभात आहे आता पतंग माझा
येणार मीच खाली थकतील हात सारे
मम भाव पुष्प होडी फिरते जली मनाच्या
पकडून ठेवी ओठ रुसतील शब्द तारे
वृत्त- गा गा ल गा, ल गा गा, गा गा ल गा, ल गा गा.