-
रत्नांच्या खजिन्यामधले – RATNAANCHYAA KHAJINYAA-MADHALE
रत्नांच्या खजिन्यामधले मी रत्न अलौकिक बाई मम पुत्ररत्न झळझळते खणखणते पौरुष आई ही कन्या सात्विक माझी जणु माधुर्याची पुतळी बघ सान असोनी बनली वाटण्यास सौरभ ताई त्या आखिव गावामध्ये मूढांना पाणी पाजे तो भाऊ माझा तगडा आहेच अतिवीर भाई तोलण्या गुणांना दैवी ती सत्त्वपरीक्षा देते तेलात उकळत्या पडते ही इवली नाजुक राई पाण्यात पाहुनी मजला…
-
पद्मावति – PADMAAVATI
नको लिहू तू, नको श्रमू तू, गझला कोणी, तुझ्या विके घडीभराचा, घेच विसावा, पुढे दाटले, गच्च धुके हळूहळू अरुणोदय होइल, शांत झोपल्या, धरेवरी दिशा स्वतःही, निघे पूजना, वस्त्र तिचे मृदु, धूत फिके स्वच्छ झाडल्या, पदपथावरी, प्राजक्ताचा, सडा पडे भल्या पहाटे, वेचत पुष्पे, कोणी बालक, गणित शिके पालखीत वनदेवी बसता, चवऱ्या ढाळी, रानजुई स्वागत करण्या, पद्मावतिचे,…
-
माय मऱ्हाटी – MAAY MARHAATEE
माय मऱ्हाटी जिनवाणीसम देवा आम्हाला इंग्लिश देते नात तिचीरे सेवा आम्हाला कन्नड हिंदी गुजराथीने मऱ्हाटीस जपले तमिळ तेलगू उर्दू भरवी मेवा आम्हाला बंगालीचा पावा मंजुळ कटुता तुळु विसरे मल्याळीही संगे म्हणते जेवा आम्हाला प्रगती पाहुन गुणीजनांची मुनीवर आनंदी कधी न वाटो गुणीजनांचा हेवा आम्हाला रत्नत्रय हे हृदयी मिरवू खरी संपदाही पुण्यभूमिवर हाच मिळाला ठेवा आम्हाला…
-
भूमी ताई – BHUMEE TAAEE
पृथ्वी धरती भूमी ताई करिते नावे धारण सुंदर क्षमाशीलता तिची प्रकृती मौन घनासम पावन सुंदर शुभ्र मोगरा पर्णदलातिल सुरभित कोमल तसे शब्द हे मार्दव असते या कुसुमांसम तसेच बोलू आपण सुंदर हृदयापासुन खरे बोलतो वचनांसम त्या कृतिही करतो तोच खरा रे गुरू दिगंबर त्याचे आर्जव पालन सुंदर शौच शुद्धता अंतःकरणी असते तेव्हा ते अतिमोहक अश्याच…
-
तगडा – TAGADAA
पाठीमागे कर्तव्याचा लकडा होता पगडीवरती परंपरेचा पगडा होता स्वप्ने होती नेत्रांमध्ये स्वातंत्र्याची पुत्र गबाळा जरी भाबडा लुकडा होता विमान नव्हते बाइक नव्हती पायही नव्हते वाहन त्याचे दो चाकांचा छकडा होता उजळ भाल ते उंच नासिका त्यावर ऐनक असा चेहरा भाव त्यावरी करडा होता जमीन होती कसावयाला हृदयी श्रद्धा तब्येतीने धडधाकट अन तगडा होता
-
पूर्ण भरावे – PURN BHARAAVE
हृदय प्रीतिने पूर्ण भरावे भरभरुनी मज देता यावे जमिनीवरती पाठ टेकण्या एक चंदनी काष्ठ मिळावे तुझिया नेत्रांमधे प्रियतमा सहज सहज विरघळून जावे मदिरेचीही तहान सरली फक्त वाटते तुलाच प्यावे पंख छाटुनी कषाय भरले म्हणे ‘सुनेत्रा’ उंच उडावे
-
सोटा – SOTAA
जुळेल आता खरी कुंडली दोघांचीसुद्धा नसेल आता वक्र नजर ग्रह गोलांचीसुद्धा बडबड आता पूर्ण मिटावी सग्यासोयऱ्यांची सरेल अंतर जुळतिल नाती टोकांचीसुद्धा वाट पाहणे शिक्षा नव्हती आनंदे सरली गीते लिहुनी भोगांची अन योगांचीसुद्धा तत्त्व जाणता धर्म जाहला प्रेमाची भाषा तीच असावी देहाची अन आत्म्याचीसुद्धा करे लेखणी तुझी ‘सुनेत्रा’ प्रहार सोट्याचा घेच काळजी लेखणीतल्या सोट्याचीसुद्धा मात्रावृत्त –…