जास्वंदी की जपा म्हणू मी
कुक्षी की कुंडले स्मरू मी
रंग गुलाबी केसर कणकण
बीज मण्यांना कसे धरू मी
कणकण वाटे तुज तापाची
यावर कैसे बरे हसू मी
जपमाळेतिल स्फटिक मण्यांना
सरकवता काय आठवू मी
मेरु मुनींचा क्षमा भाव गुण
जाणुन का क्रोधात बुडू मी
मार्दव आर्जव स्वभाव असतो
कळण्या कुठवर आत खणू मी
सत्य धर्म शुचितेच्या नंतर
पुन्हा पुन्हा हे किती रटू मी