माती मिसळुन गढूळ जेव्हा लोंढा आला आला
खंदकातुनी खळाळणारा गटार नाला आला
ज्या ना खपल्या पडुन राहिल्या तश्याच खोक्यामध्ये
वर्ष संपता त्यांना विकण्या साडीवाला आला
मैफलीत तू मांड कैफियत तुझिया मुख्यार्थाची
संसदेतला दलाल मजला सांगायाला आला
मूळ स्वभावा परतुन येता मानवप्राणी देवा
धर्म अहिंसा परमहंस जिनगुरू म्हणाला आला
शिकवत आहे गझलविधा मम मंत्र जगाया जगव
भवसागर हा तरून नेण्या वल्हे भाला आला