आनंद कंद बाणा चित्रात मंजुषेच्या
ज्योती समान गाथा चित्रात मंजुषेच्या
आहे प्रवीण दुहिता..नृत्यात अलकनंदा
गाते सुरेल माया चित्रात मंजुषेच्या
उत्फुल्ल रंजनेने घनदाट कुंतलांवर
बघ माळलीय फांती चित्रात मंजुषेच्या
ओढाळ माधुरीला रेखा कशी कळावी
आहे निमात नीती चित्रात मंजुषेच्या
संध्येस स्वप्न भारी फिल्मी नवी सुजाता
स्वातीस मोतिमाला चित्रात मंजुषेच्या
कविता न चारुशीला आकाश नीलिम्याची
मधुमास चांदण्यांचा चित्रात मंजुषेच्या
गातेय मंजिरी मन मल्हार उत्तरेचा
घन देस लेखणीचा चित्रात मंजुषेच्या
माझ्या स्मृती खऱ्यांच्या मृदु अंजलीत भरल्या
पर्वात सांज पूर्वा चित्रात मंजुषेच्या
दिलदार पुत्र कन्या आहेत अढळ गुंडे
डफ वाजवी सुनेत्रा चित्रात मंजुषेच्या
गझल अक्षरगणवृत्त …मात्रा चोवीस
लगावली – गागालगा/लगागा/गागालगा/लगागा/