असून वळणे रीत प्रीतिची – ASUN VALANE RIT PRITICHI


असून वळणे रीत प्रीतिची सरळ तुझी मज आवडते
ऐक प्रियतमा तुझ्याच इतुकी गझल तुझी मज आवडते

कधी झरा हा खळाळणारा किती मनाला लोभवतो
डोहासम पण गहिरी प्रीति सजल तुझी मज आवडते

विरघळते तव नयनी पुरती खास तुझी ही नजर अशी
ओठ उघडण्या एक अंगुली कुशल तुझी मज आवडते

कितीक नजरा चंचल भ्रमरी भुरळ पाडती जरी कुणा
गोठवणारी लीन पापणी अचल तुझी मज आवडते

रंगबिरंगी नकली वेष्टन हवे कशाला श्रद्धेला
अस्तित्वावर उत्कट भक्ती विमल तुझी मज आवडते

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.