पाऊस उखळात कांडे धो धो
आषाढ अधिकात नाचे धो धो
फुसांडे वेगात गर्जत उसळत
नदी पावसाळी वाहे धो धो
प्रपाता ओतीत जलास घुसळत
पाऊस धबाबा सांडे धो धो
फेनील पाण्यात तुषार उधळित
पाऊस रंगात रंगे धो धो
विजेचा आसूड फिरवित ढगात
पाऊस हुंदडे धावे धो धो
मात्रावृत्त (१०+४+४=१८ मात्रा)