मार फडके व्हावया ऐना उजळ
नित्य बस ध्यानास आत्म्याला उजळ
अर्थ तव येईल हाती भरभरुन
भरत जा आभाळ गगनाला उजळ
तू नको घालूस चष्मा ती म्हणे
करितसे मेकप दिसायाला उजळ
का बरे ऐकू अशी तव बात मी
मज मला कळते भले व्हाया उजळ
आगमांना कोळुनी प्याल्यावरी
तळ सुनेत्रा जाहला माझा उजळ