भूवरी सांडते चांदणे चालताना गझलकारिणी माधवी
त्यागुनी दाव तू माय तरही गझल अंधश्रद्धे तुझी ओणवी
कर्म प्राचीन हे बोलते बघ तुझे आज द्याया फळे शाम्भवी
जानकी जाण तू सत्य शिव पारखाया तुझी कागदी पल्लवी
खोल गर्तेतल्या भोवऱ्यासंगती घेत वळसे झुले मोकळे
मान वेळावते वल्लरी ही कवी कल्पना ना नदी जान्हवी
दूर क्षितिजावरी दाटता मेघमाला निळ्या वीज लोळे पदी
वेड लागे नभा चुंबण्याचे सुरे लाघवांनी तिच्या लाघवी
पावसाची सुता ओतता घागरी मोतियांच्या सरीवर सरी
सावळ्या चिंब वेलींवरी वाजती कंकणे पैंजणे जोडवी
अक्षरे वर्णमालेतली तोलता मी सुगंधी फुलांनी लते
वारियाची घुमे शीळ रानातुनी गावया मारवा भैरवी
मी सुनेत्रा सई जाणते षण्मुखी नाव माझे खरे मानिनी
पूजते मी जिनाला शिवाला जरी तोच अल्ला असे मौलवी