कुळाचार – KULACHAR


कुठे तार नाही
खुला पार नाही

बसू आज कोठे
खरा यार नाही

लगावून द्याया
नवा वार नाही

कसे गोत्र नक्की
कुळाचार नाही

न गारा न वर्षा
धुवाँधार नाही

खुराड्यात लोळे
नभी घार नाही

“सुनेत्रा”स बंदी
असे दार नाही


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.