कोपरखळी – KOPAR KHALHEE (NUDGE)


गालावरची खळी दिसावी तमात कैशी
डोहात जळी अळी दिसावी तमात कैशी

लावून नजर ढगात कोणी बसेल जेंव्हा
पानात मुकी कळी दिसावी तमात कैशी

बिंदू नुक्ता टिळा कुळाचार तीट नसता
गझलेत गज़ल दळी दिसावी तमात कैशी

घेता सल्लेखना नदीने खड्या पहाडी
खोऱ्यातिल जावळी दिसावी तमात कैशी

चपलेने छिंदता निळाई नभांगणाची
लाजूनी जांभळी दिसावी तमात कैशी

हातांनी घासल्याविना दोन गारगोट्या
भक्कम शिसवी फळी दिसावी तमात कैशी

खटका काळा उभा “सुनेत्रा ” उजेड पडण्या
काळी कोपरखळी दिसावी तमात कैशी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.