खलास … मुक्तक
खलास करते रण अतिरेकी डोके एखादे
खलात कुटते चिकणि सुपारी डोके एखादे
गडे काफिया मुक्तकातला ओळख सुंदर
रफार ई वर जणु वेलांटी डोके एखादे
अलबेली … मुक्तक
जशी टोकरी हवी हवेली हवी
तशीच मैत्री मज अलबेली हवी
कुसुमांकित तनु पर्ण चित्र पाऊस
अशीच छत्री कवीस वेली हवी