कुठून येते खुशी मनाला नकळत माझ्या
सूर ताल लय गझलियतेला उजळत माझ्या
शुभ अशुभाच्या मिश्रणास पण ढवळत माझ्या
फटके देते अशुभाला ती खवळत माझ्या
निमताळी ना गझल गोमटी मनी माऊ ग
सदैव बसते अवळ्यालाही सवळत माझ्या
शुभ कर्मांसह वात्सल्याचे घर बांधे मी
भरतीच्या गाजेवर गाजत उसळत माझ्या
शब्द घनांतुन झरे लेखणी रत्नत्रय धन
तेच निवडते ज्ञान रवीने घुसळत माझ्या
औषध काढे बनवण्यास ठेवे अग्नीवर
रसोईतल्या कढईमध्ये उकळत माझ्या
दिवाळीस मम घरात नांदो सुख शांती धन
सत्य सुनेत्रा ये हृदयाला कवळत माझ्या