फुले गुलाबी लाल दलांची
किती स्तुती रिचवाल दलांची
कवी मनाचे वेड जपाया
कुणी बदलली चाल दलांची
सुसाट दौडे अश्व कड्यांवर
कशास ठोकू नाल दलांची
कुठे कशाला भेट भटकणे
नको नको ती ढाल दलांची
दले सुनेत्रा वेच तळीची
विणावयाला शाल दलांची
फुले गुलाबी लाल दलांची
किती स्तुती रिचवाल दलांची
कवी मनाचे वेड जपाया
कुणी बदलली चाल दलांची
सुसाट दौडे अश्व कड्यांवर
कशास ठोकू नाल दलांची
कुठे कशाला भेट भटकणे
नको नको ती ढाल दलांची
दले सुनेत्रा वेच तळीची
विणावयाला शाल दलांची