चिंधी संधी….. (दोन मुक्तके)
मला हवी तर मिळेल मजला संधी बिंधी
कशास बांधू जखमेवरती चिंधी बिंधी
रक्त सांडुदे म्हणून करते कानाडोळा
तुला वाटते तशी न मी रे अंधी बिंधी
…
इच्छा आहे जगावयाची म्हणून मी या जगती आहे
मरेन केव्हातरी पुढे मी तुजसाठी पण संधी आहे
मरावयाची असली चिंधी संधी मजला नकोच आहे
इच्छेविन मज मारायाची यमास सुद्धा बंदी आहे