स्वभाव जाणून मम चैतन्य विभोर
तुझ्या स्वभावात रम चैतन्य विभोर
भाव विभोरता त्याग पुद्गलातली
जाणुनी उत्तम खम चैतन्य विभोर
परवशता पाशवी कधी न जाहली
गळास लागता भ्रम चैतन्य विभोर
झळाळते हृदय पुन्हा गळुन भावना
मनातला खिरुन तम चैतन्य विभोर
सजल सुनेत्रात जिनबिंबात पहात
रोख श्वास घेत दम चैतन्य विभोर