भोवतीच्या रिंगणाला चालताना लंघ मित्रा
तुज सदोदित रोखणारी वाहने कर भंग मित्रा
घे भरारी ठोक भीती चुम्ब शिखरे पर्वतांची
सोकलेले अंध मांत्रिक सोड त्यांचा संघ मित्रा
कंच हिरवी लाल माती सप्तरंगी इंद्रधनुतिल
लाव दुजाला स्वतःला भावती ते रंग मित्रा
गाल गाल लगावलीची शेर बब्बर धीर सांगे
गोष्ट मैत्रीची खरी पण चंट चालू तंग मित्रा
धर्म हृदयी पाळणारे मुनि दिगंबर पूज्य मजला
दावते मी सत्य सुंदर बाज शिवमय ढंग मित्रा
नित्य स्वाध्याया कपाटी संग्रही मी ठेवले रे
आगमांतिल पूर्व चौदा आणि अकरा अंग मित्रा
जंग जंग जरी पछाडे भूत अस्सल मम सुनेत्रा
साथ देता गझल माझी जिंकतेरे जंग मित्रा