वाट असूदे अथवा वाद
जीव जगविण्या देते साद
कर्मधर्म संयोग घडून
अंतरातला ऐकू नाद
गझल झरतसे कंठातून
म्हणता मी मजला इर्शाद
चरणांवर शेरांची रास
सर्वार्थ सिद्धी पूज्यपाद
मुनी दिगंबर मन जिनधाम
देय “सुनेत्रा” सुंदर दाद !
वाट असूदे अथवा वाद
जीव जगविण्या देते साद
कर्मधर्म संयोग घडून
अंतरातला ऐकू नाद
गझल झरतसे कंठातून
म्हणता मी मजला इर्शाद
चरणांवर शेरांची रास
सर्वार्थ सिद्धी पूज्यपाद
मुनी दिगंबर मन जिनधाम
देय “सुनेत्रा” सुंदर दाद !