दोन रुबाया
जिनदेव …
रुबाईची लय पकडून झरते झरझर अक्षर गाणे
जिनदेव अंतरी वसे दिगंबर जगण्या स्वतंत्रतेने
कशास शोधू देव काष्ठी अन जळी स्थळी पाषाणी
झरझर झरती भूमीवरती माझी अक्षरगाणी
जिनप्रतिमा …
या ब्रह्मांडाचा धर्म अहिंसा जिनानुयायांचा
मम देहच अवघा झाला आहे जिनमंदिर सांचा
अंतर्यामी जिनप्रतिमा स्थित नित्य दर्शनासाठी
जिनवानी ज्ञानामृत पाजे सत्य पंच परमेष्ठी