प्रेम खेचण्या इतुकी ताकद सुरात माझ्या
माझी नियती दवा जादुई करात माझ्या
हवेत परिमल तरंगणारा लयीसवे मम
बागडती पाखरे अंगणी घरात माझ्या
असेल वेडा पीर कुणी तो नेक जाणता
मोहरून थरथरतो भिजतो स्वरात माझ्या
हरेक जीवांसाठी माझा जीव जागतो
जिवंत स्वप्ने दिडदा दिडदा उरात माझ्या
ताल गझलचा ठेका अनवट प्राण सुनेत्रा
कळ मायेची बळ गरुडाचे परात माझ्या