तीन मुक्तके …………..
भोचक ….
ओगराळ वा वरंगळी जर तुला वाटती भोचक बीचक
अर्थ सांग तू धारेवरचा धारेवरुनी खोचक बीचक
खंगाळुन घे धारेखाली घासून फळीवरली भांडी
ऊन फाल्गुनी झेल तयांसव अनुभव घेण्या रोचक बीचक
डांग….
टांग मारली ठरव कुणी
डांग गाठली कळव कुणी
अंग आंबता कळकटता
भांग पाजली ग तव कुणी
सद्दाम …..
मडके फुटले चुकून की मुद्दाम फोडले
बोल रुदाली कबूल कर सद्दाम फोडले
साठावर तव कशी पोचली टक्केवारी
‘सुनेत्रा’तले हिशेब मी उद्दाम फोडले