प्रीती – PRITI


कागदी ना पुफ्फ माझी गझल तृष्णा
सौरभावर तप्त झुकली अधर तृष्णा

रसरसावी शेगडीतिल कोळशांवर
सरकलेल्या झाकणातुन झरत तृष्णा

गरगरूनी भोवऱ्यासम खुडत नुक्ते
कळत नकळत टपटपावी कलश तृष्णा

दे सुवर्णाला झळाळी फुलव भट्टी
आग ज्वाळामालिनीतिल तलम तृष्णा

का गजाने मोजता येते तग़ज्जुल..
जोडते प्रीती “सुनेत्रा” तरफ तृष्णा

 

`

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.