तुझे घेत आहे काही
तुला देत आहे काही ।।
मृदू पालवीने फुलतो
पुन्हा पुन्हा फळतो रमतो
नवे येत आहे काही
तुला देत आहे काही…
अंगणात नाचे वारे
उघड खिडक्या सर्व दारे
प्रेम नेत आहे काही
तुला देत आहे काही…
पाजु पाणी तरू रोपा
बांधुयात घरटे खोपा
वाळु रेत आहे काही
तुला देत आहे काही…
काव्यमळा हाका मारी
तेथ नित्य माझी वारी
शब्द शेत आहे काही
तुला देत आहे काही …
2 responses to “काव्यमळा – KAVYAMALA (Garden of poetry)”
वाह !!
Surekh…..