काजळीने काजळे ना रात आता
खुट्ट होता हलत नाही पात आता
त्या दिव्यांची जात नाही माळण्याची
माळती पणत्या खुशीने वात आता
झोपती बाळे सुखाने शांत चित्ते
अंधश्रद्धा रडत नाही गात आता
काय सांगू भोवतालीच्या बघ्यांना
दैव घडवे धैर्यशाली हात आता
वात कोमल कापसाची मम सुनेत्रा
तूप साजुक भिजविते स्नेहात आता