साजिरें गोंडस… बाळ गणेश ….
नाचे पदी बांधूनिया चाळ .. गणेश …. धृ. पद
मावळात धूप पावसाचा खेळ…
मुळा इंद्रायणी बेरजेचा मेळ ..
पवनेच्या काठी… धोंडा श्रावणाचा …..
झाळ गणेश ..
ढेकळे तापली रान धुमारले …
कीड मारूनिया ऊन विसावले ..
मृण्मयी करात .. धरी नांगराचा …
फाळ गणेश …
दिशा झुंजूमुंजू कुंकवात न्हाती ..
पहाटे पहाटे काकड आरती ..
स्वच्छ दलदली… सांडतो ओंजळी …
साळ गणेश ….
दीपांचा उजाळा धुपाचा दर्वळ ..
भरून निर्झर वाहे खळखळ ..
चंदनाची उटी …गळा विजयाची …
माळ गणेश …
बळीला जो पिळी त्याची खाक मुळी …
शिवारात साळी गंध हळदुली…
मुनींच्या पाऊली येतोय चतुर्थ …
काळ गणेश ….
साजिरें गोंडस… बाळ गणेश ….
नाचे पदी बांधूनिया चाळ .. गणेश …. धृ. पद