आहे अजून आहे आहे हयात मी पण
व्यवहार चोख माझा मम निश्चयात मी पण
काव्यास मोल इतुके झुकती बड्या असामी
शब्दात भाव भरता आदी लयात मी पण
स्वर साधना सुरांची तालात चूक नाही
मन मेघ बरस बरसे झरत्या वयात मी पण
तारा जुळून आल्या नकळत मला तुलाही
वृत्तात सत्य वृत्ती नाही भयात मी पण
नामी इथे सुनेत्रा तरतेय राजहंसी
बिंबी जलात हलत्या आहे पयात मी पण