जलद गतीने जलद बरसले
जलधर गगनी गाली हसले
कडाडताना वीज नभांगणि
ढग घन लोभी का खेकसले
मुसळ घुसळती पाऊस धार
जणु कोसळते कंटक धसले
जिनालयाच्या कलशामध्ये
पद्माग्नीचे धन रसरसले
गोकुळातल्या शिवरायाला
अग्निहोत्री गो मूळ सले
भलेभले जनवारी धारक
काहुन पर दलदलीत फसले
ओळख पाहू तूच सुनेत्रा
कोण तरकले कोण तरसले