बकरी म्हण वा तिला भाकरी
पसंत खाण्या मला भाकरी
बाकुर सारण काहीही भर
उचल करंजी कला भाकरी
लळा लागल्यावरती बकरी
खाऊ म्हणते चला भाकरी
देय बाहुली थापुन भाकर
भाजतोय बाहुला भाकरी
तांदुळ ज्वारी रागीचीही
करून देते तुला भाकरी
क्षुधा शमविते लोरी गाते
दोन तागडी झुला भाकरी
उदरभरण अबलांचे करण्या
देह तपविते बला भाकरी