दर्पणी माझिया मौन अंदाज तू
लक्ष्य भेदून जाई तिरंदाज तू
स्वच्छ ऐन्यामधे बिंब तव श्रीमती
आरसा नीर वारा घरंदाज तू
शांतता चारुता चंद्रमा अंबरी
त्याग मिथ्यात्व अन घे भवंदाज तू
डाव दांडू चिनी भारती इंग्रजी
उडव तू झेल तू हो गुलंदाज तू
मार चौकार रे सा लिही गावया
ठोक छक्का सुनेत्रा फलंदाज तू