जाईल जीव ऐसे हसणे बरे नव्हे
रडवून तेच रडणे बघणे बरे नव्हे
रंगावरून आत्मा कैसा कळे खुणा
कळतेच सर्व मजला म्हणणे बरे नव्हे
मनमोर नाचणारा म्हणता नको नको
तू त्यास जवळ ये ये वदणे बरे नव्हे
उधळून रंग सारे श्रावण निघून गेला
तो भादव्यात येता धरणे बरे नव्हे
शेरात नाव लिहिण्या जागा कितीतरी
मक्त्यातली सुनेत्रा पुसणे बरे नव्हे