मी पणा – MEE PANAA


झाकुनी पाहिले ना बांधून पाहिले
माठ घ्यावा तसे तुज ठोकून पाहिले

वाचणे सोसते ना जीवास ते तसे
फक्त व्यवहार जपण्या वाचून पाहिले

जाणले निश्चयाने आत्म्यात मी पणा
उकळुनी नीर बाकी गाळून पाहिले

नाटके पाहिली मी पात्रात भूमिका
घासुनी पात्र माझे विसळून पाहिले

स्वच्छता आवडे अन धुडगूस सावळा
पारवे अंगणी बघ पाळून पाहिले

कैक पोती जुनेरी फाटून संपता
पायपुसण्यास दारी टाकून पाहिले

जाळुनी मम सुनेत्रा अक्षर खरोखरी
जीवघेण्या परीक्षा देऊन पाहिले
लगावली – गालगा/गालगागा/ गागाल/ गालगा/
वृत्त अभयकांती


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.