मुक्तक …
प्रेमासाठी ती आसुसली ..एक राजकन्या
प्रीतीच्या स्पर्शाने उठली …एक राजकन्या
स्पर्शालाही महाग केले ..धर्म कसा वैरी
माणुसकी जपणारी असली …एक राजकन्या
मुक्तक…
पाऊस जोगव्याचा सर जोगव्यात न्हाली
शांतीत रंग भिजले सर लाडवात न्हाली
हंडे भरून सांडे सुख कोवळ्या उन्हाचे
ओतून धान्यराशी सर सांडव्यात न्हाली