वळे वेढणी शुद्ध हेम मम पीळ अंतरी
तुझी वारिया घुमत राहुदे शीळ अंतरी
बिंब म्हणूकी भास धुक्याचा भाषेवरती
हृदय जलावर फिकुटलेली नीळ अंतरी
जरी कळीचा नारद कोणी कळ उघडाया
कळा कलेच्या कुणास भावा खीळ अंतरी
किती ग सुंदर शील तुझे हे झरझरणारे
दृष्ट न लागो सबब तीट हा तीळ अंतरी
जाण तीन रत्नांची महती खाण गुणांची
नकोस शोधू कुठेच आता बीळ अंतरी
तव मायेचा सागर उसळे अवती भवती
शब्द तराया तुझाच जपला गीळ अंतरी
गुलाब जामुन शेर सुनेत्रा मेज वाण मी
हलके हलके उलगडणारा रीळ अंतरी