तीन मुक्तके …
व्यास ..
पाय जरी नव्हते राजी जावयास पुढती
ठाम निश्चयाने केला पार व्यास पुढती
मुक्तकास श्वासच करती पूर्ण मम सुनेत्रा
ऊर्ध्वगती वेडापायी पदन्यास पुढती
क्षमता ..
पाऊस पडतो जलद भरता
वर्षा बरसते मळभ गळता
बाराक्षरांचे काव्य गोमटे
काव्य सिंहकटी दिव्य क्षमता
काळिमा ..
रणरणत्या उन्हात झळाळत कोण उभे
खळखळ निर्झरात खळाळत कोण उभे
तनी मनी अंतरी दाटता काळिमा
कषायांस धुण्या क्षळाळत कोण उभे