शुभ्र चांदणे निळसर अंबर – SHUBHRA CHANDANE NILASAR AMBAR


शुभ्र चांदणे निळसर अंबर माझे दादा
वसुंधरेवर हसरे झुंबर माझे दादा

जरी भासती भोळा शंकर माझे दादा
करतिल आता जंतर मंतर माझे दादा

माणसातुनी देव घडविती संत-महात्मे
फुलांस जपती फोडुन कंकर माझे दादा

प्रेमासाठी देशासाठी हटून मागे
जिंकतील सत्याचा संगर माझे दादा

किती गोरटे किती देखणे रुबाब करतिल
खरे हेच पण जगात सुंदर माझे दादा

विणून धागे वसने देती दहा दिशांना
अनंत शंभर जणु विश्वंभर माझे दादा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.