नवीन कोरी फटफट भारी
चाके हलती लटलट भारी
अकबर बिरबल खाशी जोडी
गुजगोष्टींची वटवट भारी
यती भंगाची कशास चिंता
नील गगन धरती पट भारी
सोळा मात्रा मोज सरसकट
पाणवठयावर घट घट भारी
कुठुन शब्द सरसहा पातला
कोड्यामध्ये किचकट भारी
कोड पाच शेरांचे जमले
शेर सहावा गळवट भारी
भरून काठोकाठ वाहतो
शुद्ध जलाने पनघट भारी
हत्तीच्या सोंडेसम धारा
जिनायतन धडधाकट भारी
शून्य प्रहर गुरगुरे खरेपण
झीरो गिळतो गटगट भारी