आज गाऊ दे – AAJ GAAOODE DE (let me sing today)


आज गाऊ दे मला प्रियतमा
मुक्त मनाने काही
मला न वाटे भलते काही
तुलाच भारी घाई
मी न कुणाला पुसले काही
मी न कुणावर रुसले
वेड्या हट्टापायी माझ्या
कुणास ना मी छळले
मी माझ्यातच रमले इतुकी
आत आत वळले
मूर्त तुझी पाहुनी तिथे मी
आनंदे रडले
काव्यसखीचे बोट धरोनी
भवती तुझिया फिरले
फिरता फिरता तुला घेऊनी
बाहेरी पडले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.