कैफियत – SITUATION


हृदय सरोवर मम देहातील
त्यात उमलले पद्म सुकोमल
पद्म न लांच्छन पद्मपभूला
ते तर शुद्धात्मा जिन ईश्वर

सुमतीनाथ न चकवा देती
तपोलीन तन आत्मा पक्षी
अभिनंदन संभव तीर्थंकर
अजितनाथ जिन वृषभ जिनेश्वर

सुपार्श्व् स्वस्तिकात स्थापते
अर्थ कधी ना विपरीत काढे
म्हणून मन मम स्थिर शांतीत
चंद्रप्रभूसम सिद्धशिलेवर

मैफल भरली इथे वहीवर
कैफियत मांडण्या भराभर
लिहीत जाता झरे काव्यरस
अपभ्रंश प्राकृतात झरझर

गझल असो वा सुनीत कविता
असो दशपदी भारूड गाथा
अभंग ओवी गीत लावणी
चमत्कृतींचा सोस सोसूनी

मरगळल्यावर तनामनाने
अलंकार अन शब्दांमधले
अति अतिशय अती त्यागुनी
कैफियत मैफलीत यावी

शांतरसाने भरून वहावी
मुक्तपणे छंदात नहावी
रसिकांच्या हृदयात वसावी
दाद निसर्गा तुझी मिळावी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.