निळ्या सावळ्या तळ्याच्या काठी पाऊस बघत उभे रहावे
झरझरणाऱ्या धारांसंगे पाऊस गाणे गात रहावे
कृष्ण धवल बदकांचे ढंग डोळे भरून पहात
काठावरच्या वटवृक्षांचा चिंब कचभार उदवून द्यावा
पिवळ्या फुलांच्या झुडुपामागे वाघोबाचा भास व्हावा
असा पाऊस असे तळे स्मरणामध्ये साठवून घ्यावे
कागदावरती चित्र रेखून त्यात सुंदर रंग भरावे