मौन मानस मोर माथ्यावर मुरारी
मुसळ माळा मुघल माया नर मुरारी
डौल तोरा मर्दिनी तव नर्तकीचा
मूठ मारुन मूळ मंथन कर मुरारी
कोसळे नक्षत्र कुठले मज तमा ना
मोरपंखी मलय मानक हर मुरारी
ना धरी धारेवरी गुण व्यर्थ कोणा
मायबोली माधवी मोहर मुरारी
निर्मितीचा कलश भरता सहज झेले
मोरचूदी मारव्याचा स्वर मुरारी
वेड झरणारे सुगंधी अंतरीचे
मेघनेने माळलेली सर मुरारी
अष्टद्रव्ये भाव रत्नत्रय सवारी
मार्दवाचे मखर मंदिर धर मुरारी
सोलले डाळिंब खापा फणस बरका
मानधन माहेर मौजे गर मुरारी
सप्तरंगी इंद्रधनुला पेलणारी
मूकमाटी मावळातिल भर मुरारी
सात तत्वे आगमातिल जाणण्या नय
मौन माती मृत्तिका मृदु शर मुरारी
धूप दशमीला “सुनेत्रा” गगन चुंबे
मम मनोरा मृत्तिकेचे घर मुरारी