मतलबी ना माय वाली राहण्या
लेकरांसह शांत झाली राहण्या
बाप जरका जाणता अन मान्यवर
लेकरांचा खास वाली राहण्या
आब राखूनी स्वतःचा जीवनी
पारखाया राख ढाली राहण्या
च्यायला अन चाय ला तिल फरक बघ
ही शिवी शोभेल गाली राहण्या
पुत्र जर आहे हवा तुज संयमी
मेहुणी उजवेल साली राहण्या
त्या तुझ्या खेळात खेळी खेळण्या
काय मिळवे ती रुदाली राहण्या
दो टक्याची नोकरी पण निसटता
निवडली धंदा प्रणाली राहण्या
बोलका करण्यास उद्यम वेगळा
रुळविली बोलीत पाली राहण्या
भावपूजा अर्घ्य देते अंतरी
कांचनी ताबाण थाली राहण्या