विमल मावशी !
ओन्ली विमल .. विमल मावशी…..
पुन्हा भेटली विमल मावशी
मनमोकळी बडबडी मावशी
दूरध्वनी वर जरी बोलतो
मनोमनी संवाद साधतो…
आठवते मज…
लांब केस वेण्या छान
झुळझुळ साडी मूर्ती सान
डोळ्यावरती काळा गॉगल
ऊन प्राशुनी करण्या शीतल
बुद्धीवंत अन हुशार खूप
साधे निर्मळ सात्विक रूप
विनम्र वृत्ती निरहंकारी
बोलायाची सदा तयारी
तिचा जन्मदिन तारीख तेरा
संसाराचा सुटण्या फेरा ..
विमलनाथ तीर्थंकर तेरावे
त्यांच्यासम मम निजगुण व्हावे
बांध मावशी तशी प्रकृती
गुणानुरागी अपुली मैत्री
विनम्र वृत्ती जोडत जाते
झटकन जुळण्या अंतर नाते
असेच राहो नाते सुंदर
जपेन त्याला सतत निरंतर .. … .. .