कोण फिरविते सांग रे
तरी न देते थांग रे
कळेल का मज गूढ ते
कोण पाजते भांग रे
कधीच ना मज वाटली
प्रीत खरी विकलांग रे
साद ऐकली स्वप्नात
केकारव की बांग रे
देइन तुजला पंख मी
हवी कशाला रांग रे
पळून गेले दु:ख हे
सोड गड्या पंचांग रे
कोण फिरविते सांग रे
तरी न देते थांग रे
कळेल का मज गूढ ते
कोण पाजते भांग रे
कधीच ना मज वाटली
प्रीत खरी विकलांग रे
साद ऐकली स्वप्नात
केकारव की बांग रे
देइन तुजला पंख मी
हवी कशाला रांग रे
पळून गेले दु:ख हे
सोड गड्या पंचांग रे