पावलांनी इथे का वळावे ?
डोळियांनी असे का झुकावे?
भेट झाली खरीना तरीही,
गीत ओठी कशाने फुलावे!
मी न माझी कुणीरे! कुणाची ?
प्रश्न वेडे मला का पडावे ?
टाळले आसवांना तरीही
आज गाली हळू तू फुलावे!
अर्थ सांगू कसे मी कुणाला?
श्वास माझे तयांचे पुरावे
वृत्त- गा ल गा गा, ल गा गा, ला गा गा.