प्रीतकी जंजीर हो या अभिमानका खंजीर,
भाषा ब्रह्मांडकी हो या पिंडकी,
धर्म राष्ट्रका हो या देशका,अथवा प्रादेशीक..
हृदयका धर्म प्रेम होता हैं …
दोन रुबाया
१) कोसला..
होऊन फुलपाखरु मकरंद प्राशाया
कोसला धडपडे कोष फोडुनी सुटण्या
घोळात रुबाई मात्रांच्या पण येई
स्वातंत्र्य जपाया मार्ग स्वतःचा घेई…
२) पाकळी
मृदु पाकळी मनाची प्रेमे उलगडता
दवबिंदुत भिजुनी सहजच विरघळता
जा भेट जनांसी सांगाया हित कानी
गुलझार हवेवर लहरत पानोपानी …