लटपट कळकट पाय सखी तव कंपीत काहून
लटपट नटखट गाय सखी तव कंपीत काहून
फुसफुस पुटपुट अस्फुट अक्षर ओढून ताणीत
लटपट अनवट हाय सखी तव कंपीत काहून
लवचिक कणखर वायर फायर इंग्लीश उच्चार
लटपट झटपट फाय सखी तव कंपीत काहून
जपत समरण कर कायर भेकड कोणी न सैनीक
लटपट कडवट राय सखी तव कंपीत काहून
झळझळ खळखळ चंचल चाल “सुनेत्रा”त अंकीत
लटपट गळवट काय सखी तव कंपीत काहून